Ad will apear here
Next
‘पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी’
सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड

पुणे : ‘पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच झाडे लावून ती जगवली पाहिजेत. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे. सायकलचा वापर करावा. प्लास्टिकला हद्दपार करायला हवे,’ असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. परिसर हिरवागार आणि प्रदूषणमुक्त करण्याचा निश्चय शिक्षक-शिक्षतेकर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केला. पाणी, पेट्रोल, वीज अशा नैसर्गिक वस्तूंचा दुरुपयोग करणार नाही, पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात करून सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.

प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, ‘वाढते दूषित वातावरण आणि पर्यावरणविषयक समस्या लक्षात घेत ‘सूर्यदत्ता ग्रुप’मार्फत  विद्यार्थ्यांमध्ये सतत जागरूकता निर्माण केली जाते. त्यासाठी ‘वनराई’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन धारिया, पद्मविभूषण डॉ. सुंदरलालजी बहुगुणा, पद्मभूषण अण्णा हजारे, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आदींनी मार्गदर्शन केले आहे. झाडे लावणे, सायकल रॅली, रामनदी स्वच्छता मोहीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर हीटिंग सिस्टीम, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांत सूर्यदत्ता परिवार हिरीरीने सहभागी होतो.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTQCB
Similar Posts
‘जागतिक स्पर्धेत सक्षम होण्यासाठी ‘ग्लोबल एक्स्पो’ उपयुक्त’ पुणे : ‘आज उद्योग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा हे त्यापैकी एक आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कंपन्या वेगवेगळ्या देशांशी आयात-निर्यातीच्या स्वरूपात व्यवसाय करीत आहेत. म्हणूनच जागतिक बाजापेठेतील स्पर्धेत सक्षम होण्यासाठी ‘ग्लोबल एक्स्पो’सारख्या उपक्रमांची गरज आहे
‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित ‘जॉबफेअर’ला प्रतिसाद पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन करण्यात आले होते. कार्निव्हल जगातील सर्वांत मोठ्या क्रूजसह अन्य क्रुज कंपन्या आणि देशविदेशातील पंचतारांकित हॉटेल्स या जॉबफेअरमध्ये सहभागी झाले होते.
‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट’चा फॅशन शो उत्साहात पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीतर्फे आयोजित ‘ल क्लासे’ फॅशन शो नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्स आणि मॉडेल्सनी केलेले त्याचे उत्कृष्ट सादरीकरण यांमुळे या फॅशन शोने उपस्थितांची मने जिंकली. फॅशन शोचे हे आठवे वर्ष होते
‘विद्यार्थ्यांची जडणघडण गुरुच्या हातात’ पुणे : विद्यार्थी आपल्या गुरुकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे शिक्षकानेही आपले आचरण चांगले ठेवायला हवे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. शिक्षकांबरोबरच पालकांनीही पाल्याला योग्य संस्कार द्यावेत. आईप्रमाणे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली, तर मुलांची अधिक प्रगती होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language